Header Ads

Karanja lad News - उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर कारंजा येथे शांतता समितीची बैठक संपन्न

शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखून साधेपणाने उत्सव साजरे करावेत 

वाशिम जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे कारंजा चे जनतेला आवाहन 

कारंजा दि.१३ - आगामी येणारे सण उत्सव हे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील या दृष्टीकोणातून सर्वच नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी कारंजावासीयांना केले. 

स्थानीक महेश भवन येथे आज सायंकाळी ६ वाजता आगामी नवरात्रोत्सव व ईद ए मिलाद ह्या उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर शांतता समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे, नगराध्यक्ष शेषराव ढोके, कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, कारंजाचे ठाणेदार सतीश पाटील सह कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन, धनज पोलिस स्टेशन तसेच मानोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हे ही उपस्थित होते. 

मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन करतांना साध्या पद्धतीने उत्सव साजरे करावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेस सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

कार्यक्रमामध्ये मागील वर्षी २०१९ मध्ये पार पडलेल्या नवदुर्गा उत्सव दरम्यान उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या पहिल्या तीन नवदुर्गोत्सव मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरान्वित करण्यात आले. 

शांतता समितीच्या या सभेस पोलिस पाटील, शांतता समिती सदस्य, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक, नवदुर्गा उत्सव समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.