Header Ads

माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे यांचे दुःखद निधन - Former MLA and leader Dr. Jagannath Dhone passed away

Dr. Jagannath Dhone Former MLA

Former MLA and leader Dr. Jagannath Dhone passed away
माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे यांचे दुःखद निधन 

अकोला दि.27 -  माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांचेवर आज दुपारी  12-30  वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद  महाविद्यालय परिसरातील डॉ .वंदनाताई ढोणे स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

M.S. सर्जन असलेले डॉ.जगन्नाथ ढोणे हे एक विशेष राजकीय पकड़ असलेले नेते होते. ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, अकोला जिल्हा भाजपा सिंचन परिषदेचे संयोजक म्हणून कार्य करीत होते. सर्वप्रथम राष्ट्रवादी कांग्रेस च्या टिकिट वर ते अकोट मतदार संघातुन आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर वेगळ्या विदर्भ चा मुद्दा हाती घेत, भाजपा मध्ये प्रवेश करून त्यांनी त्यासाठी मोठे योगदान दिले. 

त्यांच्या निधनाने एक विदर्भवादी नेता हरविला आहे.  माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांचे निधनामुळे  त्यांचे चाहते, कार्यकर्ते सह विदर्भ च्या राजकीय परिपेक्षात एक शोक लहर पसरली आहे.

No comments

Powered by Blogger.