Header Ads

18 Oct - washim corona news जिल्ह्यात आणखी ९० कोरोना बाधित; २२ जणांना डिस्चार्ज

 


Washim Corona News Today 90 Positive 

दि.१८ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ९० कोरोना बाधित; २२ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१८ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ९० व्यक्ती कोरोना बाधीत आले असून २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५३८२ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील काळे फाईल येथील १, सुंदरवाटिका येथील २, अल्लाडा प्लॉट येथील २, गांधी चौक येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, मोठा उमरा येथील १, अनसिंग येथील १, तांदळी येथील २, काटा येथील ७, शेलू बुद्रुक येथील १, बोरखेडी येथील २, कोकलगाव येथील १, कोंडाळा झामरे येथील १०, अडोळी येथील २, जांभरुण नावजी येथील २, रिसोड शहरातील पंचवट गल्ली येथील १, जुनी सराफा लाईन येथील ५, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, बाळखेड येथील ५, गोंढाळा येथील ३, लोणी येथील २, येवती येथील १, व्याड येथील १, सवड येथील १, हराळ येथील ३, मोठेगाव येथील १, हिवरा पेन येथील १, मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील ३, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सतरा येथील २, वार्ड क्र. एक येथील १, वार्ड क्र. तीन येथील १, अकोला नाका येथील २, जऊळका येथील २, नागरतास येथील १, मंगरूळपीर शहरातील १, वसंतवाडी येथील १, पार्डी ताड येथील १, कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर येथील १, शेवती येथील २, काजळेश्वर येथील २, सिरसोळी येथील ३, रहाटी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 आज २२ डिस्चार्ज; ३ मृत्यूंची नोंद  

दरम्यान, आज २२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसातील ३ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.

    कोरोना बाधितांची सद्यस्थिती

    एकूण पॉझिटिव्ह – ५३८२
    ऍक्टिव्ह – ७०३
    डिस्चार्ज – ४५६२ 
    मृत्यू – ११६

    (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

    No comments

    Powered by Blogger.