Header Ads

Karanja News - श्री. कामाक्षा देवी संस्थान मध्ये घटस्थापना Kamakhya Devi karanja Ghat Sthapana

Kamakhya Devi karanja

Kamakhya Devi karanja Ghat Sthapana 

श्री. कामाक्षा देवी संस्थान मध्ये घटस्थापना 

कारंजा दि.१८ : आश्वीन शुध्द प्रातिपदेचे शुभ मूहुर्तावर काल दि१७/१०/२०२० रोजी कारंजा शहरातील ऐतिहासिक व प्राचिन अशा Kamakhya Devi karanja Ghat Sthapana श्री.कामाक्षा देवी संस्थान येथे  घटस्थापना करण्यात आली. स्थानिक गोंधळी नगरातील या मंदिरात शासनाच्या निर्देशानुसार कोणतीही गर्दी न होऊ देता  मोजक्याच ब्रम्हवृंद, पुजारी, गोंधळी व भाविक भक्त मंडळीचे साक्षीने ही घटस्थापना करण्यात आली. 

प्रात:काळी कारंजेकराचे आराध्य दैवत कुलस्वामिनी श्री. कामाक्षा मातेला पंचामृत, गंगाजलाने दुग्धाभिषेक, अभ्यंग स्नान , पातळ परिधान, अलंकार भूषण करण्यात येऊन घटस्थापना व दुपारी महाआरती करण्यात आली. त्यानंतर जय भवानी जय मल्हार गोंधळी मंडळ कारंजा व श्री आसरा माता महिला भजनी मंडळ कारंजा यांच्या संगीतमय भजनाचा कार्यकम झाला . सांयकाळी ०७:०० वाजता महाआरती झाली यावेळी प्रामुख्याने हभप. दिगंबर पंत महाजन महाराज, हभप .ज्ञानेश्वर  कडोळे प्रा. राहूल महाजन, रोहीत महाजन, प्रा. दिनेश कडोळे, संजय कडोळे, भजन मंडळींपैकी, शेषराव इंगोले, सौ . सरला इंगोले, सौ. छाया ताई गावंडे,  सुरेश हांडे, गजानन मेटकर व इतर मोजकी मंडळी उपस्थित होती. 

सामाजिक अंतर राखूनच धार्मिक विधी पार पाडण्यात आले. मंदिर परिसरात  यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे शुकशुकाट दिसत होता.

No comments

Powered by Blogger.