Header Ads

04 Oct - Washim District Corona News - आज जिल्ह्यात ६८ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४५७०

              

Maze Kutumb Mazhi Jababdari Logo

दि.०४ आँँक्टोंबर : आज वाशिम जिल्ह्यात ६८ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४५७०  

04 Oct - Washim District Corona News Today - 68 Positive

   वाशिम (जनता परिषद) दि.०४ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ६८ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४५७० पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज ६८ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गणेशपेठ येथील २, काळे फाईल येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, नालंदा नगर येथील १, लक्झरी बसस्थानक परिसरातील १, करुणेश्वर मंदिर परिसरातील १, लाखाळा येथील २, सिव्हील लाईन येथील १, कारागृह परिसरातील १, साखरा येथील १, कळंबा महाली येथील १, पिंपळगाव येथील ४, केकतउमरा येथील १, रिसोड तालुक्यातील खडकी येथील १, मोठेगाव येथील २, भरजहांगीर येथील १, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर येथील ८, वरुड रोड येथील २, जांब रोड येथील १, एसबीआय परिसरातील १, धनगरपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंप्री अवगण येथील ३, सोनाळा येथील १, वनोजा येथील ४, वारा येथील १, सोनखास येथील १, पिंपळखुटा येथील १, स्वासीन येथील १, घोटा येथील १, शेलूबाजार येथील २, कारंजा लाड शहरातील एम.जे. स्कूल जवळील १, बाबरे कॉलनी परिसरातील ३, एसबीआय परिसरातील १, टिळक चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील १, रामनगर येथील १, यावर्डी येथील १, पिंपळगाव येथील ३, नागलवाडी येथील १, धामणी खडी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ४७ डिस्जार्च 

दरम्यान, आज ४७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४५७०
ऍक्टिव्ह – ५८६
डिस्चार्ज – ३८८८
मृत्यू – ९५
इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.