Header Ads

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये यशाचे शिखर गाठण्याची क्षमता - प्रा. निर्मलसिंह ठाकुर


ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये यशाचे शिखर गाठण्याची  क्षमता - प्रा. निर्मलसिंह ठाकुर

कारंजा (का.प्र.) दि.०३ - बाबासाहेब धाबेकर विद्यालय पसरणी आणि आदीशक्ती महिला बहुउद्देशिय संस्था, वाल्हई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादुर शास्ञी जयंती निमित्त  ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 'करीयर नियोजन' या विषयावरील मोफत ऑनलाइन व्याख्यान दिनांक 02 ऑक्टोबर रोजी गुगल मिट अँपच्या माध्यमातून प्राचार्य बाबु पप्पुवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. 

        या व्याख्यानामध्ये नरसी मोनजी विद्यापीठ, मुंबई येथील सहाय्यक प्राध्यापक, करीयर मार्गदर्शक तथा आदीशक्ती महिला बहुउद्देशिय संस्थेचे संचालक प्रा. निर्मलसिंह ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तथा मानसिक कनखरता असल्यामुळे स्वतःचे अंतर्गत गुण ओळखून करीयर निवडले तर ते यशाचे शिखर गाठू शकतात. विद्यार्थ्यांनी कल्पकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ग्रामीण भागातसुध्दा नवनवीन व्यवसाय संधी ऊपलब्ध होऊ शकतात असे यावेळी बोलताना प्रा. ठाकुर म्हणाले. 

आपल्या संभाषणामध्ये प्रा. ठाकुर यांनी कृषि, कृषिपुरक ऊद्याेग, आरोग्य, आदरतिथ्य,नागरीक सेवा, कार्यक्रम व्यवस्थापन, किरकोळ    व्यवस्थापन, संरक्षण अशा क्षेत्रांमधील करीयर संधी बद्दल विद्यार्थ्यांना माहीती दिली तसेच त्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिलीत.

कार्यक्रमाचे सुञ संचालन तथा आभार प्रदर्शन बाबासाहेब धाबेकर विद्यालय, पसरणी चे शिक्षक संतोष नेमाने यांनी केले. या ऑनलाइन व्याख्यानाकरीता शिक्षक प्रफुल्ल गुजर, अनिता डांगे, रणजीत धाबेकर, शाळेतील तथा परीसरातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक ऊपस्थीत होते.

No comments

Powered by Blogger.