Header Ads

02 Oct - Washim District Corona News Today - आज वाशिम जिल्ह्यात ४८ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४४६४

            

Maze Kutumb Mazhi Jababdari Logo

02 Oct - Washim District Corona News Today - 48 Positive

दि.०२ आँँक्टोंबर : आज वाशिम जिल्ह्यात ४८  कोरोना बाधीत; एकुण संख्या ४४६४  

   वाशिम (जनता परिषद) दि.०२ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ४८ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ४४६४ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज ४८ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील ४, समर्थनगर येथील १, कासारगल्ली येथील २, अनंत कॉलनी परिसरातील ४, माळीपुरा येथील १, पळसखेड येथील १, देगाव येथील १, मालेगाव शहरातील १, शिरपूर जैन येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, बरालिंग मंदिर परिसरातील ३, शिवाजी नगर येथील १, यशवंत कॉलनी परिसरातील २, आदर्श कॉलनी परिसरातील १, खेर्डा येथील १, धनज येथील १, धोत्रा येथील १, मंगरूळपीर शहरातील बाबरे नगर येथील १, नाथनगर येथील २, जिल्हा परिषद शाळा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, वनोजा येथील १, सनगाव येथील १, भडकुंभा येथील १, शेलूबाजार येथील २, शिवणी येथील १, पिंप्री येथील १, आसोला येथील १, मानोरा तालुक्यातील कार्ली येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज १०९ डिस्जार्च 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १०९ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या धोडप, देपूळ व पेनबोरी येथील प्रत्येकी १ अशा एकूण ३ मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४४६४ 
ऍक्टिव्ह – ६३३
डिस्चार्ज – ३७३६
मृत्यू – ९४

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यू चा  यामध्ये समावेश नाही.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.