Washim RTO Monthly Camp Taluka wise Dates
Washim RTO
Washim RTO Monthly Camp Taluka wise Dates
मोटार वाहन निरीक्षक यांच्या
तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर
वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यातील मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीतील मासिक शिबिरांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Karanja Lad - कारंजा लाड येथे ४ व १८ सप्टेंबर, ५ व २० ऑक्टोबर, ५ व २० नोव्हेंबर, ४ व १८ डिसेंबर रोजी, Risod - रिसोड येथे ७ सप्टेंबर, ९ ऑक्टोबर, ९ नोव्हेंबर, ७ डिसेंबर रोजी, Manora - मानोरा येथे ११ सप्टेंबर, १४ ऑक्टोबर, ११ नोव्हेंबर, ११ डिसेंबर रोजी, Mangrulpir - मंगरूळपीर येथे १५ सप्टेंबर, १६ ऑक्टोबर, १७ नोव्हेंबर व १५ डिसेंबर रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
यापैकी कोणत्याही दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास दुसऱ्या कार्यालयीन दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. सकळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. प्रत्येक शिकाऊ अनुज्ञप्ती झाल्यानंतर टॅब सॅनिटाइज करून घेण्यात येईल. अर्जदारांनी Mask मास्क, हातमोजे व स्वतःचे सॅनिटायझर घेवून कार्यालयात यावे. सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असे वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
खूप छान माहिती....विजय भड कारंजा
जवाब देंहटाएंधन्यवाद 💐
हटाएंGood*
जवाब देंहटाएंIs this Confirm on 4th Sept.Camp
जवाब देंहटाएंNews as given by department
हटाएंIs this confirm on 15th sept. Camp
जवाब देंहटाएंNews as given by department
हटाएं