Header Ads

Washim RTO - License test on every Saturday, Sunday

RTO Washim, Up pradeshik pariwahan adhikari
आता प्रत्येक शनिवारी, रविवारी होणार अनुज्ञप्ती चाचणी
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती

Washim RTO - License test on every Saturday, Sunday

          वाशिम, दि. ११ (जिमाका) : नागरिकांच्या सोयीसाठी आता प्रत्येक शनिवार, रविवारी सुद्धा शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) आणि पक्की अनुज्ञप्ती यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. १७ सप्टेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टी दिवशी व त्यानंतर ३१ ऑक्टोंबर २०२० पर्यंत प्रत्येक शनिवारी, रविवारी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
          १७ सप्टेंबर रोजीची स्थानिक सुट्टी व त्यांतरचे शनिवार, रविवारी शिकाऊ अथवा पक्की अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी ऑनलाईन स्वरुपात स्लॉट बुकिंग करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञा. ए. हिरडे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.