Header Ads

Ansing Atikraman News : गावातील रहदारीच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण स्वयम स्फूर्तीने स्वतः हुन काढावेत

atikraman in ansing district washim, priyanka gawali

Ansing Atikraman News 
गावातील रहदारीच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण  स्वयम स्फूर्तीने स्वतः हुन काढावेत 
अनसिंगच्या ग्रा.पं.प्रशासक कु.गवळी यांचा आवाहनातुन ईशारा

अनसिंग दि.११ (प्रति.) - नुकत्याच ग्राम पंचायतच्या प्रशासक म्हणून रुजू झालेल्या कु.प्रियंका गवळी यांनी ग्राम पंचायत क्षेत्रात होणार्‍या अतिक्रमणामुळे लोकांना होणार्‍या त्रासाकडे पाहता, अतिक्रमण हटविण्याचे कायर्र् हाती घेतले.  अनसिंग येथे रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे ये-जा करण्यास, वाहतूकीस व नागरिकांना चालणेसाठी होत असलेल्या त्रासाला दुर करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. यासाठी स्थानीक पोलिस कर्मचारी यांना सोबत घेत त्यांनी या भागातील अतिक्रमण काढण्याचे काम हाती घेतले. 
हि अतिक्रमण मोहिम आता नियमित राहणार असून ग्राम पंचायत अंतर्गत सर्व व्यापारी व नागरिकांनी आपआपल्या दुकाना बाहेरील अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे असे आवाहन केले आहे. अतिक्रमण स्वत:हून न काढल्यास ग्राम पंचायत कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासक कु.प्रियंका गवळी यांनी दिला  आहे. या अतिक्रमण हटाव मोहीम मध्ये स्थानिक पोलीस कर्मचारी व ग्राम सेवक बोडके यांचा सहभाग होता.

No comments

Powered by Blogger.