Header Ads

वाशिम जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

 पुढील पाच दिवस विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन

         वाशिम, दि. ११ (जिमाका) : मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात ११ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० या कालावधीत विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे. जिल्ह्यात या नैसर्गिक आपत्ती संदर्भातील सर्व संबधित यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.


No comments

Powered by Blogger.