Header Ads

दैनिकाचे संपादक व जिल्हा आवृत्ती संपादक वरील खोटे खंडणीचे गुन्हे मागे घ्या - पत्रकार बांधवांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

washim all reporters

दैनिकाचे संपादक व जिल्हा आवृत्ती संपादक वरील खोटे खंडणीचे गुन्हे मागे घ्या

वाशीम पत्रकार बांधवांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

          वाशीम (प्रति) दि.११  - जिल्हयातील अग्रगण्य दैनिक विदर्भ मतदारचे मुख्य संपादक अ‍ॅड. दिलीप एडतकर व जिल्हा आवृत्ती संपादक नितीन पगार यांच्याविरोधात पोलीसांनी कोणतीही शहनिशा न करता केवळ आकसापोटी शहर पोलीस ठाण्यात खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. हे खोटे गुन्हे त्वरीत मागे घेण्याच्या मागणीसाठी पत्रकार बांधवांनी ११ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकांना संयुक्त निवेदन दिले.

         निवेदनात नमूद आहे की, पत्रकार नितीन पगार यांनी फिर्यादीसोबत आजपर्यत कधीही कोणत्याही प्रकारचे बोलभाषण केले नाही आणि फिर्यादीसोबत त्यांचा कोणताही संबंध नाही. असे असतांना फिर्यादीने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या खोट्या तक्रारीची पोलीसांनी कोणतीही शहनिशा न करता शहर पोलीसांनी केवळ आकसापोटी  दैनिक विदर्भ मतदारचे मुख्य संपादक अ‍ॅड. दिलीप एडतकर व जिल्हा आवृत्ती संपादक नितीन पगार यांच्या विरोधात १० सप्टेंबर रोजी रात्री खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार लोकशाहीच्या चवथ्या आधारस्तंभाची मुस्कटदाबी करणारा आहे व निर्भिडपणे पत्रकारीता करणार्‍या पत्रकारांचे मनोधेर्य खच्ची करणारा आहे. पत्रकार पगार हे श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पोलीसांनी आकसापोटी पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करणे म्हणजे जिल्हयातील पत्रकारांची मुस्कटदाबीच आहे. या निंदनिय घटनेचा निषेध करण्यात येत असून पत्रकारांवरील हे खोटे गुन्हे त्वरीत मागे घ्या अन्यथा राज्यातील पत्रकार बांधव या घटनेची दखल घेतील अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

          निवेदनावर पत्रकार धनंजय कपाले, नागेश घोपे, चंद्रकांत लोहाणा, विनोद तायडे, राजदत्त पाठक, प्रदीप टाकळकर, प्रमोद लक्रस, सुनिल मिसर, नाजीर शेख, प्रांजल जैन, रितेश देशमुख, शाश्‍वत आंबेकर, राम चौधरी, पप्पु घुगे, नंदकिशोर वैद्य, संदीप पिंपळकर, सुनिल पाटील, अजय ढवळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरिक्षक आदींना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.