Header Ads

MBA MMS 2020 Admissions to Start in second week of October - Uday Samant

Uday Samant, Higher and Technical Education Minister Uday Samant

MBA MMS 2020 Admissions to Start in second week of October

Higher and Technical Education Minister Uday Samant

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए / एमएमएस प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

         मुंबई (महासंवाद द्वारा) दि. ९ - एमबीए / एमएमएस MBA / MMS Education Admission Procedure अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल,  पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत Higher and Technical Education Minister Uday Samant यांनी सांगितले.

          श्री. सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दिनांक २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

          एमएएच – एमबीए / एमएमएस - २०२० MAH - MBA/MMS – 2020 च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.