Header Ads

Approval to start school on voluntary basis

Permission To Start Schools on Voluntary Basis

९ ते १२ वी च्या शाळा २१ सप्टेंबर पासून ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास केंद्राची काही अटींसह मान्यता 

नवी दिल्ली दि. ९ - २१ सप्टेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा ह्या ऐच्छिक तत्वावर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. 
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कोणत्याही प्रकारे वही, पेन, पेन्सील, पाण्याची बाटली आदींची देवाण घेवाण करता येणार नाही. शाळेत कोणत्याही प्रकारचे खेळ खेळणे किंवा कार्यक्रम वा उप्रकम राबविणेसाठी एकत्रीत रित्या जमा होण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. 
तसेच विशेष म्हणजे शाळेत येणेसाठी पालकांची लिखीत स्वरुपात परवानगी आवश्यक आहे. म्हणजेच जर पालकांची ईच्छा असेल तरच विद्यार्थी शाळेत जाईल. तसेच शाळा व परिसरात प्रत्येक विद्यार्थीमध्ये किमान ६ फुट चे अंतर राखणे तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी मास्क घालणे हे बंधनकारक राहणार आहे. 

No comments

Powered by Blogger.