Header Ads

Appeal to all establishments : Update information on 'Mahasvayam' website

Mahaswayam, Mahaswayam washim district news


Appeal to all establishments : Update information on 'Mahasvayam' website

सर्व आस्थापनांनी ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याचे आवाहन
बेरोजगार उमेदवारांनी पोर्टलवर आधार लिंक करावे

          वाशिम, दि. १० (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना दर तीन महिन्यांनी ऑनलाईन ई.आर.-१ सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) अधिनियम १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व कलम ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याकरिता या आस्थापनांची माहिती (प्रोफाईल) अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांना यापूर्वी प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकून आपल्या आस्थापनांची प्रोफाईल  www.mahaswayam.gov.in अर्थात ‘महास्वयंम’ या नवीन वेबपोर्टलचा वापर करून ‘एम्प्लॉयमेंट’ या टॅबमध्ये एम्प्लॉयर लॉगीनमधून आपल्या आस्थापनेची माहिती (प्रोफाईल) अद्ययावत करावी.
          माहिती अद्ययावत करताना आपल्या आस्थानाचा पत्ता पॅन अथवा टॅन क्रमांक, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, मेल आयडी, वेबसाईट, अधिकारी अथवा कर्मचारी संख्या इत्यादी माहिती भरून अद्ययावत करावी. पोर्टलद्वारे सर्व खाजगी तथा शासकीय आस्थापना आपल्या आस्थापनामधील रिक्त मनुष्यबळाची मागणी सुध्दा नोंदविता येईल. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत खासगी आस्थापनांनी नियुक्त केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार ३०० ते एक हजार रुपये विद्यावेतन सहा महिन्यांपर्यंत दिले जाते. या योजनेचा खासगी आस्थापनांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘महास्वयंम’ पोर्टलवर आधारलिंक करण्याचे आवाहन

          जिल्ह्यातील सर्व युवक, युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या तसेच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून www.rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक, युवतींनी या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे. ज्याउमेदवारांनी या आधी नोंदणी केली असेल त्यांनी नोकरी विषयक संधीचा लाभ घेण्यासाठीआपल्या प्रोफाईलला आधार क्रमांक लिंक करावा. तसेच आपल्या शैक्षणिक, कौशल्य व अनुभवाची अद्ययावत नोंदणी करावी. अन्यथा आपले प्रोफाईल नूतनीकरण स्थगित करण्यात येईल, आपणास नोकरीविषयक माहिती उपलब्ध होणार नाही, असे श्रीमती बजाज यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.