Matsya Jale Purawatha Yojana मत्स्य जाळे पुरवठा योजना
![]() |
Adiwasi Vikas Vibhag |
Matsya Jale Purawatha Yojana
मत्स्य जाळे पुरवठा योजना आदिवासी बांधवांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. 23 (जिमाका) : अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कायक्षेत्राअंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेत आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य जाळे पुरवठा करणे ही योजना मंजूर आहे. वैयक्तिक स्वरुपात छोट्या नद्या, नाले, तलावात मासेवारी करून आपली जीविका चालविण्यासाठी अर्थार्जन करीत असलेल्या लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी २८ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैयक्तिक स्वरुपात छोट्या नद्या, नाले, तलावात मासेमारी करून आपली जिवीका चालवित असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स्वतः उपस्थित राहून कार्यालयात अर्ज सादर करावा. ज्येष्ठतेनुसार व जिल्हानिहाय लक्षांकानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Post a Comment