Link Adhar To Mahaswayam Portal Till 30th Sept - ‘महास्वयंम’ पोर्टलवर आधार लिंक करण्याचे आवाहन
![]() |
Link Adhar To Mahaswayam Portal Till 30th Sept |
Link Adhar To Mahaswayam Portal Till 30th Sept
३० सप्टेंबर पर्यंत ‘महास्वयंम’ पोर्टलवर आधार लिंक करण्याचे आवाहन
वाशिम, दि. २३ : जिल्ह्यातील सर्व युवक, युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या तसेच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून www.rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक, युवतींनी या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
ज्या उमेदवारांनी या आधी नोंदणी केली असेल त्यांनी नोकरी विषयक संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या प्रोफाईलला ३० सप्टेंबर २०२० पर्यंत आधार क्रमांक लिंक करावा. तसेच आपल्या शैक्षणिक, कौशल्य व अनुभवाची अद्ययावत नोंदणी करावी. अन्यथा आपले प्रोफाईल नूतनीकरण स्थगित करण्यात येईल, आपणास नोकरीविषयक माहिती उपलब्ध होणार नाही, असे श्रीमती बजाज यांनी कळविले आहे.
Post a Comment