Header Ads

रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट चा दुसरा टप्पा २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर


कारंजात प्रतिष्ठाणे, व्यवसाय व दुकाने मधील व्यक्तींचे 

रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट चा दुसरा टप्पा 
२३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर पर्यंत ६ दिवस 

सहकार्य करण्याचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन 

        कारंजा (जनता परिषद) दि.२२ - कोरोना ह्या महामारीवर नियंत्रण मिळविणेसाठी त्याचा प्रसार व प्रचार रोखले जाणे गरजेेचे आहे. त्यासाठी ट्रेसींग हे सर्वात महत्वाचे हत्यार असून टेस्टींग होणे अत्यावश्यक आहे. अनलॉक च्या प्रक्रियेनंतर सर्वच प्रतिष्ठाणे, व्यवसाय व दुकाने हे सुरु झाले आहेत. तरी येथून याचा प्रसार होऊ नये म्हणून टेस्टींग गरजेचे आहे. त्याअनुषंगाने कारंजा शहरातील काही भागातील दुकानदारांची व तेथे काम करणार्‍यांची रॅपीड ऍन्टीजन टेस्ट पहिल्या ५ दिवसीय टप्प्यात पार पडली. 

           आता शहरातील उर्वरीत भागातील प्रतिष्ठाणे, त्त्यवसाय व दुकानदारांची रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट ही दुसर्‍या टप्प्यात २३ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. सहा दिवसीय हे अभियान २९ सप्टंेंबर पर्यंत राहील. शहरातील त्या-त्या दिवशी नोंदविलेनुसार भागातील टेस्टींग करुन घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 

          सहाही दिवस नोंदणी व तपासणी चे स्थळ हे मुलजी जेठा हायस्कुल असून नोंदणी सकाळी १०.०० वाजता केली जाईल तर  प्रत्यक्ष तपासणी १२.०० नंतर करण्यात येईल. 

तारखेनुसार खालील प्रमाणे

(१) दि.२३ सप्टेंबर - जयस्तंभ ते राजकमल ड्रेसेस 

(२) दि.२४ सप्टेंबर - राजकमल ड्रेसेस ते म.फुले चौक परिसर

(३) दि.२५ सप्टेंबर - सराफ लाईन ते दिल्ली वेश, गांधी चौक परिसर 

(४) दि.२६ सप्टेंबर - टिळक चौक ते शिवाजी चौक ते गवळीपुरा 

(५) दि.२८ सप्टेंबर - शिवाजी चौक ते सुभाषचंद्र बोस पुतळ्यापर्यंत 

(६) दि.२९ सप्टेंबर - आंबेडकर चौक ते टि प्वॉइंट परिसर 

वर दिलेल्या तारखेप्रमाणे त्या-त्या भागातील प्रतिष्ठाणे, व्यवसायीक व दुकाने मधील व्यक्तींचे जास्तीत जास्त रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 


No comments

Powered by Blogger.