Header Ads

Free Webinar on 'Fresh Water Fish Farming' - मोफत वेबीनारचे आयोजन


Free Webinar on 'Fresh Water Fish Farming'

‘फ्रेश वॉटर फिश फार्मिंग’ विषयावर उद्या मोफत वेबीनारचे आयोजन

     वाशिम (जिमाका) दि. २२ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४ वा. दरम्यान Fresh Water Fish Farming  ‘फ्रेश वॉटर फिश फार्मिंग’ विषयावर मोफत वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ. रवींद्र काळे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी या वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

          वेबीनारमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी https://meet.google.com/key-paau-hkt या लिंकवर क्लिक करून या सत्रात सहभागी व्हावे. वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी ‘गुगल मीट’ (google meet) अॅप डाऊनलोड करावे. या अॅपमधून कनेक्ट झाल्यानंतर ‘आस्क टू जॉईन’ (Ask to Join) वर क्लिक करावे. सत्रामध्ये सहभागी होण्यापूर्वी १० मिनिट अगोदर जॉईन करावे. कनेक्ट झाल्यानंतर लगेच आपला व्हिडीओ व माईक बंद (म्युट) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न असल्यास माईक सुरु करून प्रश्न मोजक्या शब्दात विचारावेत व पुन्हा लगेच माईक बंद करावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.