Washim Corona News Today 09 Sept : जिल्ह्यात आज ७९ कोरोना बाधीत; संख्या २३७७ वर, २ मृत्यूंची नोंद

कोरोना वायरस टेस्ट, corona virus test, covid-19 test, covid 19 test
Washim Corona News Today 09 September
दि.०९ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज ७९ कोरोना बाधीत; संख्या २३७७ वर; २ मृत्यूंची नोंद 

वाशिम (जनता परिषद) दि.०९ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ७९ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही २३७७ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात ३५ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद ही करण्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ही ४६ वर पोहोचली आहे. 

जिल्ह्यात आणखी ७९ व्यक्ती कोरोना बाधित - 79 Positive

          Washim वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील २, महात्मा फुले चौक परिसरातील ३, गोंदेश्वर परिसरातील १, बस स्टँड मागील परिसरातील १, पोलीस स्टेशनच्या बाजूच्या परिसरातील १, रंगदाळे ले-आऊट परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, आनंदवाडी परिसरातील १, शिरपुटी येथील २, बिटोडा येथील १, दुधखेडा येथील १, हिवरा रोहिला येथील १, 
          Manora मानोरा तालुक्यातील उमरी येथील १, धामणी येथील १, उमरी खुर्द येथील २, 
          Malegaon मालेगाव शहरातील ६, कुराळा येथील १, अनसिंग येथील १, 
          Risod रिसोड शहरातील अयोध्या नगर परिसरातील ३, गीताई नगर येथील ३, निजामपुरा येथील १, पिंपळखेडा येथील १, महागाव येथील १, पिंप्री सरहद येथील २, सवड येथील ७, आसेगाव पेन येथील १, केनवड येथील १, 
          Mangrulpir मंगरुळपीर शहरातील २, शेलुबाजार येथील २, पेडगाव येथील ९, लाठी येथील ३, चांभई येथील २, चिंचाळा येथील १, 
          Karanja Lad कारंजा लाड शहरातील गांधी चौक परिसरातील १, चावरे लाईन परिसरातील ५, राजपुरा परिसरातील २, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ३५ व्यक्तींना डिस्जार्च - 35 Discharge

वाशिम शहरातील टिळक चौक परिसरातील ६, हिंगोली नाका परिसरातील १, घुनाणे हॉस्पिटल जवळील २, विठ्ठलवाडी परिसरातील ३, दत्तनगर परिसरातील १, गव्हाणकर नगर परिसरातील १, बाळू चौक परिसरातील १, खारोळा येथील ३, दोडकी येथील १, फाळेगाव कोरडे येथील १, मालेगाव शहरातील १, डव्हा येथील ३, शिरपूर जैन येथील १, करंजी येथील १, रिसोड शहरातील सराफा लाईन परिसरातील १, रामकृष्ण नगर परिसरातील १, एसबीआय परिसरातील २, अनंत कॉलनी परिसरातील १, समर्थ नगर परिसरातील १, खडकी सदार येथील १, येवती येथील १, करडा येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद - 2 Death Recorded

दरम्यान, वांगी (ता. वाशिम) येथील ६५ वर्षीय व्यक्ती व रिसोड शहरातील ब्राह्मणगल्ली येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सद्यस्थिती (Current Position) :
  • एकूण पॉझिटिव्ह   २३७७  Total Positive - 2377
  • ऍक्टिव्ह  ६८०   Active - 680
  • डिस्चार्ज  १६५१ Discharge - 1651
  • मृत्यू  ४५ (+१)   Death - 45(+1)

(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...