Header Ads

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या सूचना

         वाशिम, दि. ११ (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र तरीही जिल्ह्यात काही नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले असून चेहऱ्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी, याकरिता विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या आहेत.  

          कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या संसार्गावर नियंत्रण आणण्यासाठी चेहऱ्यावर मास्क, रुमाल अथवा गमछा बांधणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच वेळोवेळी हात स्वच्छ धुणे आदी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांना याबाबत वारंवार आवाहन करूनही त्यांच्याकडून याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे यापुढे चेहऱ्यावर मास्क न बांधता शहरात, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांकडून एकरकमी ५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आल्यास, अशा नागरिकाला शहरामध्ये फिरण्यास मज्जाव करून त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.