washim : webinar for selfemployment, ssi etc
स्वयंरोजगार, लघु उद्योग विषयक योजनांची
माहिती देण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी ‘वेबीनार’
वाशिम, दि. 0१ (जिमाका) : स्वयंरोजगार व लघु उद्योग सुरु करण्यासाठी वित्त पुरवठा तसेच इतर सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी ६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ ते ३ वा. दरम्यान ‘वेबीनार’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासनाच्या विविध महामंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील स्वतःचे व्यवसाय, उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी तसेच यापूर्वी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी या वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी ‘गुगल मीट’ (google meet) अॅप डाऊनलोड करावे. या अॅपमधून कनेक्ट झाल्यानंतर ‘आस्क टू जॉईन’ (Ask to Join) वर क्लिक करावे. सत्रामध्ये सहभागी होण्यापूर्वी १० मिनिट अगोदर जॉईन करावे. कनेक्ट झाल्यानंतर लगेच आपला व्हिडीओ व माईक बंद (म्युट) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न असल्यास माईक सुरु करून प्रश्न मोजक्या शब्दात विचारावेत व पुन्हा लगेच माईक बंद करावा. meet.google.com/xfs-caee-gez या लिंकवर क्लिक करून वेबीनारमध्ये सहभागी होता येईल. वेबीनारमध्ये सहभागी होण्याबाबत काही अडचणी असल्यास ९६६५५२५६५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.
६ ऑगस्ट रोजी दु. १२ ते १२.२० वा. दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, दु. १२.२० ते १२.४० वा. दरम्यान अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना, दु. १२.४० ते १ वा. दरम्यान चर्मकार समाजातील लाभार्थ्यांसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजना, दु. १ ते १.२० वा. दरम्यान इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजना, दु. १.२० ते १.४० वा. दरम्यान दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजना, दु. १.४० ते २ वा. दरम्यान मातंग समाज बांधवांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना, दु. २ ते २.२० वा. दरम्यान भटक्या जमाती व विमुक्त जाती प्रवर्गासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजना तसेच दु. २.२० ते २.४० वा. दरम्यान अल्पसंख्याक समाज बांधवांसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती वेबीनारमध्ये दिली जाणार आहे.
Post a Comment