Header Ads

washim corona news update 01 August : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात २६ पॉझिटिव्ह : एकूण संख्या ६२० वर

washim corona news update 01 August, karanja lad, manora, malegaon,, risod, mangrulpir

washim corona news update : 01 August

दि.०१ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात २६ पॉझिटिव्ह 

एकूण संख्या ६२० वर : आज ८ व्यक्तींना डिस्जार्च

दिवसभरात कारंजा शहरात १७ तर ग्रामीण भागात २ रुग्णांची वाढ

वाशिम (जनता परिषद) दि.०१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १८ तर संध्याकाळी ८ असे एकुण २६ व्यक्ती हे कोरोना बाधीत असल्याचे निदान लागले आहे. यांत कारंजा तालुक्यातील १९ व्यक्ती असून १७ शहरातील तर २ हे ग्रामीण भागातील आहेत. तर इतर ७ व्यक्तींमध्ये वाशिम ४, रिसोड १ व मानोरा २ रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेल्या ८ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. 
जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ही ६२० वर पोहोचली असून यांतील २१० हे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापावेतो जिल्ह्यातील १५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एका कोरोना बाधीत व्यक्तीने आत्महत्या केली आहे. 

जिल्हा प्रशासनाने दुपारी १२.३० वाजता दिलेले वृत्तानुसार १८ बाधीत

कारंजा लाड येथील अशोक नगर परिसरातील ६, शिक्षक कॉलनी परिसरातील ३, शिंदे कॉलनी परिसरातील ३, बायपास परिसरातील १, आनंद नगर परिसरातील १, कारंजा तालुक्यातील मोरंबी येथील १ व कामरगाव येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील २ अशा आणखी एकूण १८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

संध्याकाळी ०६.३० वाजता वृत्तानुसार ८ बाधीत

कारंजा लाड शहरातील अशोक नगर येथील १, हातोटीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, गवळीपुरा परिसरातील १ असे एकूण ८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ८ व्यक्तींना डिस्जार्च

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील संभाजी नगर येथील १, शांतीनगर येथील १, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील २, वाशिम शहरातील ध्रुव चौक येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील १ आणि मंगरूळपीर तालुक्यातील नांदगाव येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

सद्यस्थिती : एकुण पॉझिटिव्ह  ६२०   ऍक्टिव्ह  २१०
         डिस्चार्ज  ३९४                  मृत्यू  १५ (+१)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.