Vardhapan Din

Vardhapan Din

washim news today 4 Aug : जिल्ह्यात बुधवारी प्रतिबंधात्मक आदेश लागू

breaking news, washim news today, collector hrushikesh modak order

जिल्ह्यात बुधवारी प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश 

          वाशिम, दि. ०४ (जिमाका) : उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे ५ ऑगस्ट २०२० श्रीराम मंदिर बांधकामाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी बुधवार, ५ ऑगस्ट २०२० रोजीचे ००.०१ वा ते २४.०० वाजेपर्यंत वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू केला आहे.

          या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,  व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा करणे, अशा प्राधीकारांच्या मते ज्यामुळे नागरी सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्या कृतीमुळे राज्य प्रशासन उलथून पडण्याची प्रवृत्ती दिसून येईल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, सोंग आणणे, पत्ते खेळणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक किंवा कोणत्याही जिन्नस, वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकांमध्ये प्रसार, प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

          अंत्ययात्रा, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना हा आदेश लागू राहणार नाही. पोलीस स्टेशन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरूप योग्य कारण असेल व तसे करण्याशिवाय पर्याय नसेल तर अशा परिस्थितीत याबाबत कोणताही आदेश नजीकच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून आदेश लागू करण्यास उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, तसेच आवश्यकता वाटल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी संवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी, दंडाधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells