Header Ads

washim corona news today 4 Aug : जिल्ह्यात दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह; एकूण संख्या ७८५

washim corona news today 4 Aug; karanja lad, manora, risod, malegaon

दि.०४ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह

एकूण संख्या ७८५ वर : आज ११ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम (जनता परिषद) दि.०४ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ०३ तर संध्याकाळी २९ असे एकुण ३२ व्यक्ती हे कोरोना बाधीत असल्याचे निदान लागले आहे. आज बरे झालेल्या ११ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. 
आजपर्यंतची वाशिम जिल्ह्याचे एकूण रुग्णांची संख्या ही ७८५ झाली आहे. एक्टीव्ह रुग्ण संख्या ही ३०८ असून ४५९ व्यक्तींना डिस्जार्च करण्यात आलेले आहे. तर १७(+१) व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा प्रशासनाने दुपारी १२.०० वाजता दिलेले वृत्तानुसार ०३ बाधीत

कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील २ व शिक्षक कॉलनी परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी ०७.०० वाजता दिलेले वृत्तानुसार २९ बाधीत

मंगरूळपीर अकोला रोड परिसरातील १, कवठळ येथील ४, शेलूबाजार येथील ४, वाशिम तालुक्यातील सुंदरवाटिका येथील १, खतीबपुरा येथील १, अनसिंग येथील ६, सोंडा येथील १, रिसोड शहरातील गौसपुरा येथील १, पठाणपुरा येथील २, हराळ येथील ४, कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील १ आणि पोहा येथील ३  व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ११ व्यक्तींना डिस्जार्च

मंगरूळपीर तालुक्यातील नांदगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील वारंगी फाटा येथील ५, कारंजा लाड शहरातील अशोक नगर येथील ३ व शिंदे नगर येथील २ अशा एकूण ११ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - ७८५ ऍक्टीव्ह रुग्ण - ३०८
         डिस्जार्च - ४५९           मृत्यू - १७ (+१)

No comments

Powered by Blogger.