Header Ads

Lokshahir Annabhau Sathe educational Scholarship Scheme : १० ऑगस्टपर्यंत अर्ज करा

Lokshahir Annabhau Sathe educational Scheme
Lokshahir Annabhau Sathe 
Educational  Scholarship Scheme 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती
योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करा

          वाशिम, दि. ०४ (जिमाका) - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.
          सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या जिल्ह्यातील गुणानुक्रमानुसार ३ ते ५ विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. याकरिता गरजू, पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन फोटो, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांसह १० ऑगस्ट २०२० पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे अर्ज करावेत, असे आवाहन श्री. गाभणे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.