Header Ads

जिल्ह्यात उद्यापासून लाळ खुरकूत लसीकरण मोहीम

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत

जिल्ह्यात उद्यापासून लाळ खुरकूत लसीकरण मोहीम

         वाशिम, दि. ३१ (जिमाका) : जिल्ह्यातील पशुधनास राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुरकूत (तोंड व पाय खुरी) लसीकरणाची पहिली फेरी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर यांनी कळविले आहे.
         लसीकरणा दरम्यान जनावरांना टॅगिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २ लक्ष २१ हजार ९१७ गाय व म्हैस वर्गीय पशुधन उपलब्ध आहे. तोंड व पाय खुरी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून आपल्या सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणादरम्यान सामाजिक अंतर ठेवून पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे डॉ. बोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.