Header Ads

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन


bharatratn Pranav Mukharji
Ex-President Pranab Mukherjee Passed away 
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली दि.३१ - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज दिर्घ आजाराने नवी दिल्ली येथील लष्काराच्या रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. कॉग्रेसचे जेष्ठ नेते राहीलेले प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या कालावधीत देशाचे राष्ट्रपती होते. गतवर्षीच त्यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न हा बहुमान ही देण्यात आला होता. त्यांच्या या निधनामुळे एका मोठ्या संयमी राजकीय कारकिर्द संपली आहे. त्यांच्या या निधनामुळे देशात सात दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 
प्रणव मुखर्जी यांचा ११ डिसेंबर १९३५ रोजी बंगालमधील मिरीता येथे जन्म झाला. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असलेले कामदा मुखर्जी यांचे हे पुत्ररत्न. राज्यशास्त्र, कायदा व इतिहास यांचा अभ्यास केलेले प्रणवदा यांनी १९६३ मध्ये शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून प्रवेश केला. त्यानंतर काही काळ पत्रकारिता केल्यावर राजकारणात ते ओढले गेले. 
कॉग्रेस पक्षातर्फे ते राज्यसभेवर निवडून गेले होेते. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत निवडून आल्यावर त्यांनी २०१२ पर्यंत मंत्रीमंडळात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, वाणिज्य आदी महत्वांच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. 
२००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर २०१२ मध्ये ते देशाचे सर्वोच्च असलेले पद राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. गतवर्षी त्यांना देशाचा सर्वोच्च बहुमान असलेले भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले होते.  
त्यांच्या या निधनावर राष्ट्रपती राजनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह संपूर्ण देशात  दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. 

No comments

Powered by Blogger.