Header Ads

Manora MNS News मानोरा मनसेचे रस्त्यावर दूध ओतून आंदोलन

washim, manora mns news मानोरा मनसे

मानोरा मनसेचे रस्त्यावर दूध ओतून  आंदोलन 

दूध उत्पादकांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्या

 मानोरा दि.01 - दूध उत्पादकांना कमी झालेल्या दूध दराच्या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. 

washim, manora mns news मानोरा मनसे

महाराष्ट्रातील शेतकरी अगोदरच सततच्या दुष्काळामुळे व बोगस बियाणे यामुळे आलेल्या दुबार पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहे. त्यातच कोणामुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतीला जोड म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय कमी झालेल्या दूध दराच्या समस्यांमुळे अडचणीत आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे व दूध उत्पादकांना दिलासा द्यावा. या मागणीकरिता मानोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष मनोज खडसे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर दूध ओतून व हाताला काळी फीत बांधून आंदोलन करण्यात आले.

  यावेळी मनसेचे शहराध्यक्ष महादेव भस्मे, मनविसेचे तालुकाध्यक्ष पियुष देशमुख, तालुका उपाध्यक्ष ऋतिक चव्हाण, सुरज चव्हाण, सुभाष चव्हाण, ओम खोडके, निलेश पवार, करण शिंदे, मयुर पाटील, संजय राठोड, धनराज राठोड, नितीन ठोंबरे, आकाश मानकर, करण गायकवाड, दीपक मोरकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.