Header Ads

Washim Corona News Today 27 August: जिल्ह्यात आज ३७ कोरोना बाधीतांची नोंद; दोघांचा मृत्यू

Washim Corona News Today 27 August

दि.२७ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज ३७ कोरोना बाधीतांची नोंद; दोघांचा मृत्यू 

 एकुण संख्या १५६६ : आज २० डिस्जार्च 

वाशिम (जनता परिषद) दि.२७ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  २८ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत तर जिल्ह्याबाहेर नोंद झालेल्यांची संख्या ही ९ असून यामुळे जिल्ह्यात एकूण ३७ कोरोना बाधीतांची नोंद घेण्यात आली आहे. दिवसभरात २० व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. तर २ व्यक्तींच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात २८ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
वाशिम शहरातील तिरुपती सिटी परिसरातील १, अनसिंग येथील १, 
मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. सहा येथील ६, 
मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, नागी येथील १, 
कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, मानकनगर परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
जिल्ह्याबाहेर आणखी ९ कोरोना बाधित व्यक्तींची नोंद झाली असून जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या १४ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला आहे.

दिवसभरात २० व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील टिळक चौक, भटगल्ली परिसरातील १, दत्तनगर येथील १, नंदीपेठ येथील १, रिसोड शहरातील अयोध्यानगर येथील २, बेलखेडा येथील १, सवड येथील १, येवती येथील ३, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्ण नगर येथील १, धानोरा बु. येथील १, शिवणी येथील १, शेलूबाजार येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ३, मानोरा तालुक्यतील नैनी भोयणी येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद 

दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या शेलूबाजार येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा काल, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी मृत्यू झाला. तसेच २४ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व काल, २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेलूबाजार येथील ८४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला आहे.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १५५६ ऍक्टीव्ह रुग्ण - ३७५
          डिस्जार्च - ११६१            मृत्यू - २९ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.