Header Ads

Karanja News Today : कारंजा शहर पोलिसांचा मुख्य मार्गाने रुट मार्च

कारंजा शहर पोलिसांचा मुख्य मार्गाने रुट मार्च 

कारंजा (का.प्र.) दि.२७ - विविध सण व उत्सव हे शांततेत पार पाडावे यासाठी कारंजा शहर पोलिसांचे वतीने आज रोजी शहरातील मुख्य मार्ग व मिश्र वस्तीतून रुट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणेदार यांच्या नेतृत्वात हे रुट मार्च काढण्यात आले. 
आज रोजी ११ वाजेपासून तर १२ वाजेपर्यंत आगामी सण-उत्सव श्रीगणेशोत्सव, मोहरम शांततेत पार पाडावे या दृष्टीने जनजागृती म्हणून हा रुट मार्च काढण्यात आला. 

या रुट मार्च मध्ये ७ अधिकारी, ४४ कर्मचारी, ५० होमगार्ड, RCP पथक व SRPF २ सेक्शन असे एकूण ७ अधिकारी व १०९ कर्मचारी सहभागी झाले होते. 

No comments

Powered by Blogger.