Header Ads

श्री गणेश विसर्जन काळात वाहनांवर धारदार शस्त्रे लावण्यास मनाई

श्री गणेश विसर्जन काळात

वाहनांवर धारदार शस्त्रे लावण्यास मनाई

          वाशिम, दि. २७ (जिमाका) : श्री गणेश विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता वाशिम शहर पोलीस स्टेशन व मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात श्री गणेश विसर्जन वाहनांवर तलवार, त्रिशूल, भाला, कोयता, विळा, दांडपट्टा, कट्यार इत्यादी धारदार शस्त्रे लावण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४-अ अन्वये मनाई करण्यात आली आहे.
          १ सप्टेंबर ते २ सप्टेंबर २०२० या कालावधीत वाशिम शहर पोलीस स्टेशन व मालेगाव पोलीस स्टेशन क्षेत्रात श्री गणेश विसर्जन वाहनांवर तलवार, त्रिशूल, भाला, कोयता, विळा, दांडपट्टा, कट्यार इत्यादी धारदार शस्त्रे लावण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी पारित केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.