Header Ads

National Recruitment Agency : केंद्र सरकारची मोठी घोषणा : राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करणार

National Recruitment Agency, NRA Prakash Jawalekar

National Recruitment Agency, NRA

केंद्र सरकारची मोठी घोषणा : राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करणार

सरकारी नोकरीसाठी आता देशभरात एकच सामायिक परिक्षा होणार 

नवी दिल्ली दि.१९ - देशात नुतन शैक्षणीक धोरण लागू केल्यानंतर केंद्राच्या मोदी सरकारने आज पुन्हा एक मोठा निर्णय घेतला. राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे देशातील तरुण व तरुणींना मोठा दिलासा मिळणार असून सरकारी नोकरी साठी दरवेळेसच्या परिक्षांमुळे होणारा मोठा त्रास ही संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या मंत्रीमंडळाचे बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच या निर्णयाचे अंमलबजावणी साठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आल्याची माहिती आहे. 
केंद्र सरकारचे वतीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सरकारी नोकर भरती साठी २० पेक्षा जास्त भरती एजंसी आहेत. युवांना सरकारी नोकरी साठी अनेको परिक्षा द्याव्या लागतात. याला सामाप्त करणेसाठी देशभरातील सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परिक्षा घेण्यात येणार असा एक ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. यासाठी राष्ट्रीय भरती एजंसी (National Recruitment Agency, NRA) चे गठण करण्यात येणार आहे व या द्वारे एकच सामायिक परिक्षा (CET) घेण्यात येणार आहे. आता वेगवेगळ्या नोकरीसाठी परिक्षा देण्याचा त्रास यामुळे संपणार आहे. 
युवकांना जागोजागी परिक्षा देण्यास जाण्याचे काम पडू नये म्हणून एकच सामान्य पात्रता परिक्षा राहणार आहे. यांत गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळणार असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलेे. 

2 comments:

  1. चांगला निर्णय

    ReplyDelete
  2. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला निर्णय.

    ReplyDelete

Powered by Blogger.