washim corona news 30 July : वाशिम जिल्ह्यात आज १९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह : एकूण संख्या ५८४ : आज १६ व्यक्तींना डिस्जार्च
दि.३० जुलै : वाशिम जिल्ह्यात आज १९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
एकूण संख्या ५८४ : आज १६ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम (का.प्र.) दि.३० - आज रोजी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ११ तर सायंकाळी ८ असे एकूण १९ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. यामुळे आजपर्यंतचे एकुण रुग्णांची संख्या ही ५८४ झाली आहे. तर आज दिवसभरात १६ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून कारंजा येथील अकोला येथे उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला असल्यााचे वृत्त जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
दुपारी १२.०० वाजताचे वृत्तानुसार, ११ व्यक्ती कोरोना बाधीत
जिल्ह्यात आणखी ११ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये मानोरा शहरातील रहिमानिया कॉलनी परिसरातील २, तहसील कार्यालया नजीकच्या परिसरातील १, विळेगाव (ता. मानोरा) येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथील ३, वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १ आणि कळंबा महाली येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
सायंकाळी ७.१५ वाजताचे वृत्तानुसार, ८ व्यक्ती कोरोना बाधीत
जिल्ह्यातील आणखी ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील १, इराळा येथील ३ व कारंजा लाड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १ व मंगरूळपीर शहरातील टेकडीपुरा परिसरातील १ व लाठी (ता. मंगरूळपीर) येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान, अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे.
आज १६ व्यक्तींना डिस्जार्च
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील १०, वाशिम शहरातील ध्रुव चौक येथील १ व साईलीला नगर येथील १, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील २ व आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ आणि कारंजा लाड शहरातील नगरपालिका परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
सद्यस्थिती : *एकुण पॉझिटिव्ह - ५८४ *ऍक्टीव्ह - २०८
*डिस्जार्च - ३६४ *मृत्यू १२
Post a Comment