Header Ads

Breaking News Washim Corona News 3 Aug : जिल्ह्यात दिवसभरात ९२ पॉझिटिव्ह : शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा मुक्तसंचार

breaking news, washim corona news, today, karanja, risod, malegaon, mangrulpir, manora

दि.०३ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट; दिवसभरात ९२ पॉझिटिव्ह

एकूण संख्या ७५३ वर : आज २८ व्यक्तींना डिस्जार्च

शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा मुक्तसंचार 


वाशिम (जनता परिषद) दि.०३ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४७ तर संध्याकाळी ४५ असे एकुण ९२ व्यक्ती हे कोरोना बाधीत असल्याचे निदान लागले आहे. यांत शहरी भागाप्रमाणेच आता कोरोनाचा ग्रामीण भागातही मुक्त संचार सुरु झाला आहे, असे चित्र दिसून येते आहे.  आज बरे झालेल्या २८ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. 
जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ही ७५३ वर पोहोचली असून यांतील २८७ हे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ४४८ जणांना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. आतापावेतो जिल्ह्यातील १७(+१) व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्हा प्रशासनाने दुपारी ०१.०० वाजता दिलेले वृत्तानुसार ४७ बाधीत

वाशिम शहरातील सप्तश्रृंगी नगर परिसरातील २, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसरातील १, जांब येथील १, मालेगाव तालुक्यातील पिंपळदरा/काळा कामठा येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफ लाईन परिसरातील ५, पठाणपुरा परिसरातील १, गणेशनगर परिसरातील २, ब्राह्मणगल्ली येथील १, कायंदे सदन परिसरातील १ व भोकरखेड येथील २, हराळ येथील ३, कारंजा लाड शहरातील मजीदपुरा परिसरातील ७, हातोटीपुरा परिसरातील ७, वाणीपुरा परिसरातील १, कानडीपुरा परिसरातील १, भारतीपुरा परिसरातील २, रविदास नगर येथील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील ३, रामासावजी चौक परिसरातील २ आणि भामदेवी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी ०७.३० वाजता दिलेले वृत्तानुसार ४५ बाधीत

वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील १, गवळीपुरा येथे ३, अल्लाडा प्लॉट परिसरात ३, टिळक चौक परिसरात २, ड्रीमलँड सिटी परिसरात २, अनसिंग येथे १३, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, शेलूबाजार येथील १०, शेंदूरजना मोरे येथील १, कारंजा शहरातील विश्वंभारती कॉलनी परिसरातील १, मजीदपुरा येथील १, लोकमान्य नगर येथील १, चोरे लाईन येथील १, हातोटीपुरा येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील १ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात २८ व्यक्तींना डिस्जार्च

मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी येथील १, नांदगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील वारंगी फाटा येथील ३, कारंजा लाड येथील इंगोले प्लॉट येथील १, वाशिम येथील स्त्री रुग्णालय परिसरातील १, रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, आसनगल्ली येथील १, महात्मा फुले नगर येथील १, मांगवाडी येथील १६ व गोरखवाडी येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : एकूण पॉझिटिव्ह - ७५३ ऍक्टिव्ह - २८७
          डिस्चार्ज  ४४८ मृत्यू  १७ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्हयात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.