Header Ads

washim corona news 2 August : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात ४१ पॉझिटिव्ह

washim, karanja, corona news, karanja news, karanja update, mangrulpir, manora, news

दि.०२ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात ४१ पॉझिटिव्ह 

एकूण संख्या ६६१ वर : आज २६ व्यक्तींना डिस्जार्च

कारंजा शहरात २७ तर ग्रामीण भागात २ पॉझिटिव्ह 

वाशिम (जनता परिषद) दि.०१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३४ तर संध्याकाळी ७ असे एकुण ४१ व्यक्ती हे कोरोना बाधीत असल्याचे निदान लागले आहे. यांत कारंजा तालुक्यातील २९ व्यक्ती असून २७ शहरातील तर २ हे ग्रामीण भागातील आहेत. तर इतर १२ व्यक्तींमध्ये मंगरुळपीर तालुका ९, रिसोड १ व वाशिम तालुका १ रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेल्या २६ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. 
जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ही ६६१ वर पोहोचली असून यांतील २२४ हे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापावेतो जिल्ह्यातील १६(+१) व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्हा प्रशासनाने दुपारी ०१.०० वाजता दिलेले वृत्तानुसार ३४ बाधीत

काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील आणखी ३४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील दामिनी नगर परिसरातील ४, तुषार नगर परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील ६, वाणीपुरा परिसरातील १०, भारतीपुरा परिसरातील २, उंबर्डा बाजार येथील १, मंगरुळपीर शहरातील शिंदे कॉलनी परिसरातील १, पठाणपुरा परिसरातील १, शशिमोहन टॉकीज परिसरातील १ आणि चिखली येथील ४, रिसोड शहरातील गणेश नगर येथील १, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील १ व्यक्तीचा समावेश आहे. 

उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या कारंजा येथी महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह 

काल, १ ऑगस्ट रोजी सकाळी वाशिम कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या कारंजा लाड शहरातील माळीपुरा परिसरातील ६५ वर्षीय महिलेचाही कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी ०७.०० वाजता दिलेले वृत्तानुसार ७ बाधीत

दरम्यान, जिल्ह्यातील आणखी ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर परिसरातील १, सिंधी कॅम्प परिसरातील १, एम. बी. आश्रम परिसरातील १, दिल्ली वेस परिसरातील १ आणि वढवी येथील १, मंगरुळपीर शहरातील शिवाजी नगर येथील १, शेलुबाजार येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

दिवसभरात २६ व्यक्तींना डिस्जार्च

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट परिसरातील ५, वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स येथील १, विनायक नगर येथील १, जानकी नगर येथील ४, लाखाळा येथील ३, शुक्रवार पेठ येथील १, कळंबा महाली येथील ६, मंगरूळपीर शहरातील ताजीपुरा येथील १, तालुक्यातील  नांदगाव येथील १, शेलुबाजार येथील १, आसेगाव येथील १, मानोरा तालुक्यातील राहूल पार्क, सोमठाणा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

सद्यस्थिती : एकूण पॉझिटिव्ह - ६६१ ऍक्टिव्ह - २२४
        डिस्चार्ज  ४२० मृत्यू  १६ (+१)

No comments

Powered by Blogger.