Header Ads

Home Minister Amit Shah Corona Positive : गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉजिटिव

home minister amit shah corona positive

Home Minister Amit Shah Corona Positive
 गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉजिटिव 
मेदांता रुग्णालयात भरती 

          नवी दिल्ली दि.०२ -  केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शाह (Amit Shah) यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात ४.२४ वाजता भरती करण्यात आलं आहे. गृहमंत्री यांचे उपचारासाठी एम्स चे डॉक्टरांची चमु मेदांता रुग्णालयात जाऊ शकते. 
          अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी."
              
          

No comments

Powered by Blogger.