Header Ads

karanja lad latest news 3 Aug - police station, police back on duty after defeating corona

karanja news police station, police back on duty after defeating corona

कोरोनाला हरवून पोलिस योद्धे पुन्हा कर्तव्यावर रुजू 
कारंजाचे ठाणेदारांनी केला सन्मान

कारंजा (जनता परिषद) दि.०३ - कोरोनाला हरवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार्‍या पोलिस विभागातील कोरोना योद्धांचा ठाणेदारांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला व पुन्हा कर्तव्यावर रूजू झाल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थापही दिली. 
कारंजा शहर पोलिस स्टेशनचे काही कर्मचार्‍यांना काही दिवसांपूर्वी कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची लागण लागली होती. त्यामुळे कोरोना योद्धांनाच कोरोना झाल्यामुळे कारंजा शहरातील नागरिकही थोडेसे धास्तावले होते. मात्र यशस्वी उपचार नंतर कोरोनाला मात देत हे पोलिस कोरोना योद्धा पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यास सज्ज झाले. 
आज ड्युटीवर रूजू होत असतांना कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांनी या कर्मचार्‍यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला तसेच रोगावर मात करीत कर्तव्यावर रूजू होत असतांना पाठीवर शाबासकीची थापही दिली. यामुळे कर्मचार्‍यांचा आत्मविश्‍वास व कर्तव्य बजावण्याची, जनसेवा करण्याची उर्मी निश्‍चितच बळावली. 

No comments

Powered by Blogger.