Header Ads

Karanja News 3 August - Police Station Danga Kabu Yojana Rangit Talim

danga kabu yojana karanja police station district washim

कारंजात पोलिस स्टेशनचे वतीने आज दंगा काबू योजनेची रंगीत तालीम 

कारंजा (का.प्र.) दि.०३ - दि.०५ ऑगस्ट रोजी होणार्‍या राम जन्मभूमी शिलान्यास कार्यक्रमाचे दृष्टीने कारंजा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, या दृष्टीकोणातून जिल्हा पोलिस अधिक्षक वाशिम वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार कारंजा शहरात आज पोलिस विभागाचे वतीने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.

आज रोजी सकाळी १०.५० ते १२.५० या दरम्यान कारंजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात व शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. सदर दंगा काबू योजनेमध्ये पोलिस स्टेशन कारंजा शहर चे ५ अधिकारी व ४४ कर्मचारी, धनज पोलिस स्टेशनचे १ अधिकारी व ५ कर्मचारी तसेच कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ४ कर्मचारी उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.