Header Ads

Karanja Lad Latest News - sahitya ratna anna bhau sathe jayanti

Karanja Lad Latest News -  sahitya ratna anna bhau sathe jayanti

साहित्य सम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०० वी जयंती जन्म शताब्दी म्हणून कारंजात साजरी

          कारंजा दि. ०३ - १ ऑगस्ट 2020 ला सकाळी 8 वाजता अण्णा भाऊ साठे चौक येथे सर्वधर्मिय समाज बांधवांच्या संयुक्त विद्येमाने डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली.
           सर्व प्रथम समाजसेवक डॉ रमेश चांदनशिव व शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे चौक फलकाचे पूजन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी जि. प सदस्य जयदेव इंगळे,देविदास पवार,शंकर इंगळे,दशरथ सावळे, विठ्ठल लोंढे, दीपक वाघमारे, धनराज आरे, कानकिरड, दिलीपसिंग भाटिया, अनिता डोईफोडे,समतादूत बार्टी  प्रणिता दसरे, ज्ञानेश्वर खंडारे, किसन आडे विनायक पदमगिरवार, श्रीकांत भाके करुळे काका, भारत जोंधळे,हेमंत पापडे,यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
                   शेतकरी नेते अहमदाबादकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला देश स्वतंत्र झाला पण १६ ऑगस्ट ला अण्णाभाऊ साठेनी "ये आझादी झूठी हैं,इस देश की जनता भूखी हैं"असे त्या काळात सांगितले कामगार यांच्या समस्या सोडण्या करिता अण्णाभाऊ नी चळवळ उभी केली आपल्या पहाडी आवाजात शिवाजी महाराज यांचे पोवाडे सातासमुद्र पलीकडे जाऊन गायिले. फकिरा ही कादंबरी लिहून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना गौरविण्यात आले. जग बदल घालोनी घाव सांगून गेले मज भीमराव या त्यांचा वाक्यतून समजला बाबासाहेब समजावन्याचा प्रयत्न केला.
               देविदास पवार, पदमगिरवार, कांनकीरड यांची मार्गदर्शन पर भाषणं झालीत. कोरोना वर आयुर्वेदिक औषधे म्हणून इम्तियाज लुलनिया यांनी काढा वाटप केले, नंतर डॉ चांदनशिव यांनी मास्क वाटप केले. आदिगुंज संस्थेच्या वतीने ज्यांनी कोरोना या महामारी काळात गोरगरीब जनतेची रेशन किट वाटप करून सेवा केली अश्या कार्यकर्त्यांना "कोरोना यौद्धा" हा प्रमाण पत्र फ्रेम करून पुष्पगुच्छ देउन गौरव करण्यात आला.
         यामध्ये डॉ चांदनशिव, गजानन अहमदाबादकर, अमोल लुलेकर, इम्तियाज लुलनिया, आदित्य खंडारे डॉ निलेश हेडा, संजय कडोळे, संतोष धोंगडे, श्रीकांत भाके, मुख्याद्यापक विजय भड, पत्रकार महेंद्र गुप्ता, सुनिता डोईफोडे, देविदास पवार, किसन आडे, ऍड खंडारे, कमलेश कडोळे आदीचा सत्कार करण्यात आला.
         कार्यक्रम आयोजित मध्ये धनराज आरे, गजानन पवार, बोरकर, दिलीपशसिंग भाटिया, शंकर इंगळे, गोलू गवई, महेंद्र खोडके, भारत जोंधळे व समाज बांधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रम सुत्र संचालन ज्ञानेश्वर खंडारे तर आभार धनराज आरे यानी केले.

No comments

Powered by Blogger.