HMO orders for No E-Pass to all States : राज्यअंतर्गत व आंतरराज्य माल व प्रवासी वाहतूक वर निर्बंध लावू नयेत
HMO order for No EPass to all state
Letter by home ministry secretary Mr.Ajay Bhalla
राज्यअंतर्गत व आंतरराज्य माल व प्रवासी वाहतूक वर निर्बंध लावू नयेत
केंद्राची सर्वच राज्यांना सुचना
ई-पासची गरज नको - सरळ सरळ निर्देश
नवी दिल्ली दि.२२ - आज देशाच्या गृहमंत्रालयाने काढलेल्या एका आदेशानुसार, देशातील सर्वच राज्य व केंद्र शासीत प्रदेशांना राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य माल तसेच प्रवासी वाहतूक वर कोणत्याही प्रकारचे निर्बंध ठेवू नयेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
काही राज्य किंवा जिल्ह्यांमध्ये तेथील प्रशासन हे माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक साठी ई-पास किंवा तत्सम निर्बंध अद्यापही लावून आहेत. केंद्र शासनाने अनलॉक ३ ची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून ह्या निर्बंधांमुळे त्याची अंमलबजावणी होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
देशाची तसेच राज्यांची व जनतेची आर्थिक घडी ही मंदावू नये तसेच याला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनाने अनलॉक ३ लागू केले आहे. मात्र काही जिल्हा प्रशासन व राज्य शासन यांच्या आदेशामुळे त्याला खिळ बसत आहे. तरी तात्काळ असे निर्बंध हटविण्यात यावेत असे आदेश केंद्रीय गृह सचीव अजय भल्ला यांच्या स्वाक्षरीने निघालेले आहे.
केंद्र शासनाचे हे आदेश राज्यात व विविध जिल्ह्यांमध्ये कधी पासून लागू होणार याकडे जनतेचे लक्ष्य राहणार आहे.
Post a Comment