Washim Corona News Today 21 August : जिल्ह्यात आज ३० व्यक्ती कोरोना बाधीत, एकुण संख्या १३५२, आज ५३ डिस्जार्च; २ मृत्यूंची नोंद
Washim Corona News Today
दि.२१ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज ३० व्यक्ती कोरोना बाधीत
एकुण संख्या १३५२ : आज ५३ डिस्जार्च; २ मृत्यूंची नोंद
वाशिम (जनता परिषद) दि.२१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यातच नोंद असलेले एकूण ३० व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. तर दिवसभरात ५३ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ३० व्यक्ती कोरोना बाधित
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेर्पर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील दत्त नगर येथील ३, टिळक चौक परिसरातील १, कोल्हाटकरवाडी परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, जुनी जिल्हा परिषद परिसरातील १, जुनी नगरपरिषद परिसरातील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, महाराणा प्रताप चौक परिसरातील १, ढिल्ली येथील १, वारा जहांगीर येथील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील मेन रोड परिसरातील १, बसस्थानक परिसरातील ५, शिरपूर जैन परिसरातील ६, कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसरातील १, शिवानीनगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, रिसोड तालुक्यातील धोडप बोडकी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दिवसभरात ५३ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम शहरातील काटीवेस परिसरातील ७, ड्रिमलँड सिटी परिसरातील ३, गणेश पेठ परिसरातील १, झाकलवाडी येथील १, साखरा येथील ३, पार्डी आसरा येथील १, अनसिंग येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील ३, मुठ्ठा येथील २, शिरपूर जैन येथील १०, मंगरूळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसरातील २, जैन मंदिर परिसरातील १, शेगी येथील ९, रिसोड शहरातील जिजाऊनगर येथील १, देशमुख गल्ली येथील १, गोहगाव हाडे येथील २, एकलासपूर येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १, सोहळ येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे
आज २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद
दरम्यान, अकोला येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या कारंजा लाड शहरातील मोठे राम मंदिर परिसरातील ६९ वर्षीय व्यक्तीचा १५ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या शिरपूर जैन येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा १८ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाल्याची, तसेच जिल्ह्याबाहेर कोरोना बाधित ३ व्यक्ती बाधित आढळल्याची नोंद झाली आहे.
सद्यस्थिती :
एकुण रुग्ण संख्या - १३५२ ऍक्टीव्ह रुग्ण - ३६५
एकुण रुग्ण संख्या - १३५२ ऍक्टीव्ह रुग्ण - ३६५
डिस्जार्च - ९६२ मृत्यू - २४ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)
Post a Comment