Header Ads

washim news today 9 Aug : President of India honored Freedom Fighter Janardan Khedkar

swatantra senani janardan khedkar hounered by SDM on behalf of Presidnet of India

President of India honored  Freedom Fighter Janardan Khedkar 

आज क्रांतिदिनचे औचित्यावर स्वातंत्र्य सैनिक जनार्धन खेडकर यांचा सत्कार

महामहीम राष्ट्रपती यांच्या वतीने वाशिमचे उपविभागीय अधिकारी यांनी केला सत्कार

          वाशिम, दि. ०९ (जिमाका) :  ‘छोडो भारत’ अभियानाच्या वर्धापनदिनानिमित्त आज, ९ ऑगस्ट रोजी महामहीम राष्ट्रपती यांच्या वतीने वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी स्वातंत्र्यसैनिक जनार्धन खेडकर यांचा शाल, अंगवस्त्र देवून सत्कार केला.
          दरवर्षी राष्ट्रपती भवन येथे ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला जातो. मात्र, यंदा कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्यसैनिकांना नवी दिल्ली येथे बोलाविणे योग्य होणार नसल्याने, राष्ट्रपती भवन येथील सत्कार समारंभासाठी निवड झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा त्यांच्या घरी जावून शाल व अंगवस्त्र देवून सत्कार करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले होते.
          या कार्यक्रमासाठी राज्य शासनाने वाशिम येथील जनार्धन खेडकर यांचे नाव प्रस्तावित केले होते. त्यानुसार महामहीम राष्ट्रपती यांच्या वतीने वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी आज स्वातंत्र्यसैनिक जनार्धन खेडकर व त्यांच्या पत्नी साधना खेडकर यांचा त्यांच्या घरी जावून शाल, अंगवस्त्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.