Header Ads

Washim Corona News Today 9 Aug : जिल्ह्यात आज ३१ व्यक्ती पॉझिटिव्ह; एकुण संख्या ९३५ वर; आज ७ जणांना डिस्जार्च

Breaking washim corona news today 9 Aug; karanja lad, mangrulpir, risod

Washim Corona News Today 9 Augदि.

०९ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात  आज ३१ व्यक्ती पॉझिटिव्ह
 एकुण संख्या पोहोचली ९३५ वर; आज ७ जणांना डिस्जार्च


वाशिम (जनता परिषद) दि.०९ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ३१ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. यामध्ये दुपारी प्राप्त अहवालानुसार १४ तर संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार १७ व्यक्ती बाधीत आढळून आल्या. तर दिवसभरात ०७ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 
आजचे रुग्णांमध्ये कारंजा तालुक्यातील १८, मंगरुळपीर तालुक्यातील १०, वाशिम तालुक्यातील ३ व्यक्ती बाधीत आढळून आले आहेत. 

दुपारी ०१.३० वाजताचे वृत्तानुसार १४ बाधीत

कारंजा लाड शहरातील सुदर्शन कॉलनी येथील १, वाणीपुरा येथील १, माळीपुरा येथील १, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील ५, सिंधी कॅम्प येथील १, दादगाव येथील १, कामरगाव ३, उंबर्डा बाजार येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

संध्याकाळी ०६.३० वाजताचे वृत्तानुसार १७ बाधीत

आज सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार मंगरुळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील ९, ग्रामीण रुग्णालयजवळील पाणी टाकी परिसरातील १, वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील १, सह्याद्री पार्क, लाखाळा परिसरातील १, पांडव उमरा येथील १, कारंजा लाड तालुक्यातील आखतवाडा येथील २, कामरगाव येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात २१ व्यक्तींना डिस्जार्च

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या मंगरुळपीर शहरातील टेकडीपुरा येथील १, लाठी येथील २, रिसोड तालुक्यातील केनवड येथील २, मांगवाडी येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - ९३५ ऍक्टीव्ह रुग्ण - ३९७
डिस्जार्च - ५१९ मृत्यू - १८ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.