Washim SSC Result : मालेगांव तालुक्याचा निकाल ९५.०८% ९ शाळांचा निकाल लागला १००%
SSC Result : मालेगांव तालुक्याचा निकाल ९५.०८%
९ शाळांचा निकाल लागला १००%
मालेगांव (जनता परिषद) दि.२९ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षांचा निकाल आज दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात आला.
वाशिम जिल्ह्यातून मालेगांव तालुक्याचा निकाल ९५.०८% लागला असून तालुक्यातील ९ शाळांचा निकाल हा १००% लागला आहे.
या शाळांची नावे पुढील प्रमाणे
१) विर हुतात्मा व्हि.बी.फडके उर्दु हायस्कुल २) विश्व भारती पि.बी.आश्रम शाळा, मेडशी ३) शासकीय पोस्ट बेसीक आश्रम शाळा, मुसलवाडी ४) श्री पांडुरंग माध्यमीक विद्यालय, आमखेडा ५) पिर मो.उर्दु हायस्कुल, शिरपुर (जैन) ६) रणजीतसिंग मोहिते पाटील माध्यमीक विद्यालय, ब्राम्हणवाडा ७) स्व.एस.के.भूरे माध्य.विद्यालय, शिरपुर (जैन) ८) श्री.स्वामी समर्थ बाल संस्कार विद्यामंदीर ९) सामी हायस्कुल ऍन्ड ज्यु.कॉलेज
७८८ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये उत्तीर्ण
मालेगांव तालुक्यातील एकुण २,६६३ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी २,६४३ विद्यार्थी हे परिक्षेला प्रत्यक्ष बसलेत यांतील २,५१३ विद्यार्थी म्हणजेच ९५.०८ टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ७८८ विद्यार्थी हे डिस्टींक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. १,०४६ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, ५५० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १२९ विद्यार्थी हे पास ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
Post a Comment