Washim Corona News 29 July : आज २६ व्यक्ती कोरोना बाधीत : २१ डिस्जार्च तर एका व्यक्तीचा मृत्यू
दि.२९ जुलै वाशिम जिल्हा : आज २६ व्यक्ती कोरोना बाधीत
२१ डिस्जार्च तर एका व्यक्तीचा मृत्यू
रिसोड १८, कारंजा ५ तर मंगरुळपीर तालुक्यातील ३ व्यक्ती
वाशिम (जनता परिषद) दि.२९ - जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज एकुण २६ व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे निदान झालेले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोनाने बाधीत व्यक्तींची आजवरची संख्या ही ५६५ इतकी झाली आहे. आज २१ व्यक्तींना बरे झाल्याने डिस्जार्च देण्यात आला असून वाशिम शहरातील बेलदारपुरा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
वाशिम शहरातील व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू
दरम्यान, २६ जुलै रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील बेलदारपुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा काल २८ जुलै रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापावेतो जिल्ह्यातील एकुण ११ व्यक्तींचा कोरोना निष्पन्न झाल्यावर मृत्यू झालेला आहे.
दुपारी १२.०० वाजता प्राप्त वृत्तानुसार, १९ व्यक्ती बाधीत
रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, आसनगल्ली येथील १२ आणि मांगवाडी येथील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील मस्जिदपुरा परिसरातील एका महिलेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
सायंकाळी ६.०० वाजताचे वृत्तानुसार, ७ व्यक्ती बाधीत
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार आणखी ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा परिसरातील ३, अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील २, तर्हाळा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
आज २१ जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील फकीरपुरा येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील ४, पठाणपुरा येथील २, टेकडीपुरा येथील ३, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील ३, गजानन महाराज मंदिर परिसरातील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १, साईनगर परिसरातील २ व अशोक नगर परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
सद्यस्थिती : एकूण पॉझिटिव्ह ५६५ ऍक्टिव्ह २०६
डिस्चार्ज ३४८ मृत्यू ११
Post a Comment