Washim SSC Result 2020 जिल्ह्यात रिसोड प्रथम : तालुक्याचा निकाल ९७.४९% १८ शाळांचा निकाल लागला १००%
SSC Result जिल्ह्यात रिसोड प्रथम : तालुक्याचा निकाल ९७.४९%
१८ शाळांचा निकाल लागला १००%
रिसोड (जनता परिषद) दि.२९ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षांचा निकाल आज दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात आला.
वाशिम जिल्ह्यातून रिसोड तालुक्याने बाजी मारली असून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तालुक्याचा निकाल ९७.४९% लागला असून तालुक्यातील १८ शाळांचा निकाल हा १००% लागला आहे.
या शाळांची नावे पुढील प्रमाणे
१) भारत माध्य.कन्या शाळा २) श्री ज्ञानेश्वर विद्यालय, मांडवा ३) स्व.आ.रामरावजी झनक विद्यालय, महागांव ४) श्री.बाबासाहेब धाबेकर विद्यालय, केशव नगर ५) बाबासाहेब धाबेकर विद्यालय, येवती ६) बाबासाहेब धाबेकर विद्यालय, नंधाना ७) राजश्री शाहु विद्यालय, निजामपुर रिसोड ८) डॉ.अलमा इकबाल उर्दु हायस्ुकल ९) राजस्थान माध्य.विद्यालय, वाडीरैताळ १०) ज्ञानदिप विद्यालय, पेनबोरी ११) निवासी मागासवर्गीय माध्य. आश्रमशाळा, बिबखेडा १२) रहेमानीया उर्दु हायस्कुल १३) राजस्थान माध्य.विद्यालय १४) पार्वतीबाई नागरे माध्य.आदिवासी आश्रमशाळा, कंकरवाडी १५) जयकिसान उर्दु माध्य.विद्यालय, वाकड १६)ओम नम: शिवाय विश्व आदिवासी माध्य.आश्रमशाळा, केनवड १७) आर.उर्दु हायस्कुल वाघी (खु.) १८) गव्हर्मेंट एससी बॉइज रेसीडेंसीअल स्कुल सवड
२,२९५ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये उत्तीर्ण
रिसोड तालुक्यातील एकुण ४,६२३ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी ४,५८८ विद्यार्थी हे परिक्षेला प्रत्यक्ष बसलेत यांतील ४,४७३ विद्यार्थी म्हणजेच ९७.४९ टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी २,२९५ विद्यार्थी हे डिस्टींक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. १,५८४ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, ५२६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६८ विद्यार्थी हे पास ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
Post a Comment