SSC Result 2020 : कारंजा तालुक्याचा निकाल ९४.८४% : २० शाळांचा निकाल लागला १००%
SSC Result कारंजा तालुक्याचा निकाल ९४.८४%
२० शाळांचा निकाल लागला १००%
कारंजा (जनता परिषद) दि.२९ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षांचा निकाल आज दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात आला.
वाशिम जिल्ह्यातून कारंजा तालुका माघारला असून तालुक्याचा निकाल हा सर्वात कमी लागलेला आहे. निकाल ९४.८४% लागला असून तालुक्यातील २० शाळांचा निकाल हा १००% लागला आहे.
या शाळांची नावे पुढील प्रमाणे १) जे.सी.चवरे २) एम.बी.आश्रम ३) कंकुबाई कन्या शाळा ४) जे.डी.चवरे ५) विश्वभारती विद्यालय ६) जगदंबा विद्यालय भांमदेवी ७) ज्ञानदिप विद्यालय, लोणी अरब ८) बॅ.रामराव आदीक विद्यालय शेलुवाडा ९) हजरत आयशा आर.जे. उर्दु हायस्कुल, काजळेश्वर १०) मो.नुर उर्दु महाविद्यालय, उंबर्डा बाजार ११) इंग्लीश प्रा.शाळा, काळी कारंजा १२) ब्लु चिप कॉन्व्हेंट १३) आर.जे.सी.हायस्कुल १४) गोविंद न्यु इंग्लिश प.स्कुल १५) श्रीराम गुंजाटे पब्लीक स्कुल १६) तारांगण इंग्लीश स्कुल, धनज बु. १७) झिल इंटरनेशनल स्कुल १८) वेदांत पब्लीक स्कुल पोहा १९) श्री कानीफनाथ प.स्कुल २०) हजरत अबु बकर सिद्दीकी इंग्लीश प्रा.स्कुल
१,४०५ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये उत्तीर्ण
कारंजा तालुक्यातील एकुण ३,४६२ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी ३,४५२ विद्यार्थी हे परिक्षेला प्रत्यक्ष बसलेत यांतील ३,२७२ विद्यार्थी म्हणजेच ९४.८४ टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी १,४०५ विद्यार्थी हे डिस्टींक्शन () म्हणजेच ७५% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. १,११७ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, ६३९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ११३ विद्यार्थी हे पास ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
Post a Comment