Header Ads

washim corona news : दि.१८ जुलै : आज वाशिम जिल्ह्यात ११ व्यक्ती कोरोना बाधीत

दि.१८ जुलै : आज वाशिम जिल्ह्यात ११ व्यक्ती कोरोना बाधीत 

वाशिम (जनता परिषद) दि.१८ - आज दिनांक १८ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात एकुण  ११ व्यक्तींचा कोरोना बाबत चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. 
यामध्ये वाशिम तालुक्यातील ६, मंगरुळपीर शहरातील ३, कारंजा तालुक्यातील १ व मालेगांव शहर येथील १ व्यक्तीचा समावेश आहे. 

संध्याकाळी ७.०० वाजता चे वृत्त : ९ व्यक्ती बाधीत 

आज दुपारी जिल्ह्यातील आणखी ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वाशिम शहरातील विनायक नगर परिसरातील १ व पोलीस निवासस्थान परिसरातील १, अडगाव येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, मंगरुळपीर शहरातील पठाणपुरा येथील १ व गवळीपुरा येथील १, कारंजा लाड तालुक्यातील शिवनगर येथील १ आणि मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.

दुपारी २.०० चे वृत्तानुसार, २ व्यक्ती बाधीत 

वाशिम तालुक्यातील इलखी येथील १ व मंगरुळपीर शहरातील हाजीपुरा परिसरातील १ व्यक्तीचे कोरोना विषयक अहवाल १६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आले आहेत.

आज ६ जणांना डिस्जार्च 

दरम्यान, जिल्ह्यातील ६ जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील २, मंगरूळपीर तालुक्यातील २, वाशिम व रिसोड तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
सद्यस्थिती :------
एकूण पॉझिटिव्ह  ३५१ ऍक्टिव्ह  २०२ डिस्चार्ज  १४१ मृत्यू  ८
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.