Header Ads

Deep Amavasya 2021 : दीप अमावस्या 2021 पूजन विधी, मंत्र आणि पद्धती Somvati Amavasya

deep amavasya 2020 somvati amavasya

दीप अमावस्या 

(Deep Amavasya 2021)

पूजन विधी, मंत्र आणि पद्धती

दीप अमावस्या दिन : ०८ आँगस्ट २०२१
अमावास्या आरंभ : ०७ आँगस्ट रोजी संध्याकाळी ०७ वाजून १२ मिनीटांनी 
अमावास्या समाप्ती : ०८ आँगस्ट रोजी संध्याकाळी ०७ वाजून २० मिनीटांनी 

     दीप अमावास्या (deep amavasya) म्हणजेच आषाढ अमावस्या, ह्या अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत असते.  विशेष म्हणजे आषाढ अमावास्या  (Aashadha Amavasya) ही चातूर्मासातील पहिली अमावास्या असते. 

या अमावस्येचे महत्व म्हणजे उजेळ पसरविणारे सर्वच उपकरणे (जुन्या काळातील बरे कां), जे धुळ खात पडले आहेत, त्यांना बाहेर काढले जाते व त्यांना स्वच्छ करुन, धुवून आजचे दिवशी प्रज्वलन केले जाते. घरातील दिवे, समया, निरांजने, लामणदिवे आदी सर्वांना एकत्रीतरित्या जमा करुन ते स्वच्छ करावेत. आयुष्यातील इडा पिडा दुर होवो, मरगळ दुर होवो व ज्या प्रमाणे दिवा हा उजेळ देतो त्याच प्रमाणे आपले आयुष्य प्रकाशमान होवो हा त्या मागील उदात्त असा हेतु. 

दिवे, समया आदी स्वच्छ केल्यावर त्यांची पाटावर मांडणी केली जाते. पाटाभोवती रंगरंगोटी करुन किंवा रांगोळी काढून त्याचप्रमाणे फुलांची आरास करुन तेथे सजावट करावी. 

दिव्यांची पुजा करतांना सर्वप्रथम नमस्कार करुन आपल्या कुळाचार प्रमाणे हळद, कुंकुंम, फुले, दुर्वा आदींनी पुजा करावी. विशेष म्हणजे आजचे या दिवशी काही भावीक हे कणकेचे गोड दिवे बनवितात व त्यांचीही पुजा करुन ते तुप अथवा तेल घालून प्रज्वलीत केले जातात. आपले यथाशक्ती नैवैद्य ठेवता येईल. 

यानंतर खाली दिलेल्या मंत्राने दिव्याचे पूजन करुन प्रार्थना करावी.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम |  
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

उपरोक्त मंत्राचा अर्थ : - ‘हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर’. 

काही जागांवर दिव्यांची कथाही सांगितली जाते. मात्र ते माहिती नसल्यास, मनोभावे, श्रद्धेने व आपल्याला जमेल तशी पुजा करावी मात्र नेहमीच कुळाचार हे पाळण्याचा प्रयत्न करावा. आपला धर्म हा नेहमीच प्रकाशकडे जाण्याचा मार्ग दर्शवितो. मानसपुजा यामुळेच श्रेष्ठतम मानली गेली आहे. त्यामुळे हा सर्वच प्रकार आपले संस्कृतीचा एक भाग आहे. तो जपणे म्हणजेच धर्म, नितिमुल्ये, चर प्रमाणेच अचर याचेही मान ठेवण्याची शिकवण देणारी थोर संस्कृती याचे जतन करणे होय. 

      पितरांचे स्मरण म्हणून या दिवशी काही लोक हे तर्पण, पिंडदान देखील करतात. पितरांना तर्पण करुन पुरणाचा किंवा कुळाचार नुसार नैवेद्य दाखविला जातो. पितरांचे स्मरणार्थ दिवा लावतात. पितरांना तृप्त केले म्हणजे त्यांचे आशिर्वाद प्राप्त होतात व त्यांनाही सद्गती लाभते असे मानले जाते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.